इस्त्रायल युद्ध
नुकतेच 'इस्त्रायल' आणि पॅलेस्टाईन ची आतंकवादी संघटना 'हमास' यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले आहे. काही भारतीय इस्त्राईलला पाठिंबा देतील तर काही पॅलेस्टाईन ला पाठिंबा देतील..
आपल्याकडे इस्त्राईलबद्दल असलेले कौतुक बघता, बहुतेक भारतीय याच देशाला पाठिंबा देतील. हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की, 'हे युद्ध नेमके होतेय कशासाठी?'
आज जेथे इस्त्रायल आहे, ती जमीन शंभर वर्षांपूर्वी पूर्णपणे अरेबिक लोकांची होती. परंतु, त्याआधी आपण 2000 वर्ष मागे गेलो तर या जमिनीवर ज्यू लोकांचे राज्य होते. आपल्या हिंदुधर्माप्रमाणेच तेथील मातीमध्ये तयार झालेला हा एक धर्म. मग अरेबिक लोकांचे राज्य येथे कसे बरे तयार झाले?
ख्रिश्चन :
ज्याप्रमाणे प्रत्येक धर्मात काही ना काही चुकीच्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, त्याचप्रमाणे ज्यू धर्मात सुद्धा झाला. त्यात तेथील क्रूर राजांनी सामान्य जनतेचे अतिशय हाल केले. याला विरोध करत, दोन हजार वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताने सामान्य व्यक्तींना एक नवीन तत्त्वज्ञान शिकवले. येशु च्या मृत्यूनंतर 200 ते 300 वर्षांनी हे तत्त्वज्ञान ख्रिश्चन धर्माच्या रूपाने पसरू लागले. अनेक ज्यू लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. याचा अर्थ, आज जगभरामध्ये जे ख्रिश्चन आहेत; ते मूळचे ज्यूधर्मीय लोक. काही ज्यू लोक मात्र आपल्या धर्मासोबत कायम राहीले.
इस्लाम :
याच धरतीवर सहाव्या शतकात इस्लाम धर्माचे निर्माण झाले. मोहम्मद पैगंबर या व्यक्तीने मांडलेले तत्त्वज्ञान धर्माच्या रूपात बहुतांश अरेबिक लोकांनी स्वीकारले. त्याआधी अरेबिक लोक त्यांच्या वेगवेगळ्या चालीरितींसोबतच वेगवेगळ्या श्रद्धा स्थानांचे पूजन करायचे. आज सुद्धा इराण व अर्मेनीया येथे अनेक निसर्गपूजक लोक आढळतात.
चौदाव्या शतकापर्यंत हे तिन्ही धर्म व त्यांची छोटी छोटी राज्ये एकमेकांसोबत व्यवस्थित नांदत होते.
ऑट्टोमन टर्क :
हे मूळचे तुर्कीचे. चौदाव्या शतकात यांचा सुलतान मोहम्मद याने सर्वात शक्तिशाली ख्रिश्चन राजाला हरवत हा पूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात घेतला.
त्यामुळे ख्रिश्चन व ज्यूधर्मीय लोक हा प्रदेश कायमचा सोडून गेले.
इस्लामसाठी मक्का व मदिना ही प्रार्थना स्थळे उदयाला आली.
ख्रिश्चन संतांना इटलीमध्ये व्हॅटिकन सिटी नावाचा प्रदेश मिळाला, ज्यामध्ये त्यांनी या धर्माचे प्रमुख स्थळ उभारले.
ज्यू धर्मासाठी मात्र जेरुसलेम हेच महत्त्वाचे ठिकाण होते व कायम राहिले.
प्रत्येक ज्यूधर्मीयाचे हे स्वप्न होते की, कधीतरी पुन्हा आपण जेरुसलेमच्या त्या धरतीवर परत जावे.
त्यांच्यामध्ये तेवढी ताकद मात्र नव्हती.
प्रथम महायुद्ध :
1914 साली सुरू झालेल्या या युद्धात, इंग्लंड ऑटोमन तुर्कांविरुद्ध लढत होता. या युद्धात इंग्लंडला पैसे व सैनिकांची खूप गरज होती. भारताकडून सैनिक तर मिळत होते; परंतु, पैशांचे काय?
युरोपमध्ये विविध ठिकाणी पसरल्यापासून ज्यूधर्मीयांना ख्रिश्चन लोकांकडून वाईट वागणूक मिळत होती. त्यातल्या त्यात इंग्लंड हा देश व तेथील लोक चांगले होते. त्यामुळे बरेच ज्यूधर्मीय इंग्लंडमध्ये स्थायिक झाले होते व त्यांनी आपापले उद्योगधंदे सुरू केले होते.
त्यांच्याकडे पैशाची कमी नसल्याने, त्यांनी इंग्लंड शासनाला पैशांची मदत देऊ केली. त्या बदल्यात त्यांनी जेरुसलेमकडे थोडीफार जमीन त्यांच्यासाठी मागितली.
इंग्लंड हे युद्ध तर जिंकले, मात्र ज्यूधर्मीयांच्या जमिनीच्या मागणीकडे इंग्लंड शासनाने फारसे लक्ष दिले नाही.
दुसरे महायुद्ध :
हे युद्ध 1939 साली सुरू झाले. पुन्हा इंग्लंड शासनाला पैशांची गरज भासली. यावेळी जर्मनीमध्ये हिटलर व जर्मनीतील ख्रिश्चनांनी ज्यू लोकांवर अनन्वित अत्याचार केलेला. ज्यूधर्मीयांमध्ये ख्रिश्चनांविरुद्ध सुद्धा भावनिक रोष होता. तरीही फक्त जेरुसलेम येथील जमिनीसाठी त्यांनी पुन्हा इंग्लंड शासनाला मदत केली. इंग्लंड दुसरे महायुद्ध सुद्धा जिंकली.
यावेळी मात्र ब्रिटिश शासनाने त्यांना जमीन उपलब्ध करून दिली.
अमेरिकेचे सुद्धा मोठ्या प्रमाणात सहाय्य ज्यू धर्मियांना मिळाले.
इस्त्रायलची सुरुवात :
गरीब अरब लोकांची जमीन त्यांनी मोठ्या प्रमाणात विकत घेण्यास सुरुवात केली. जगभरातल्या ज्यू लोकांना त्यांनी तेथे बोलावले. जो व्यक्ती आपला धर्म बदलून ज्यू होईल, त्यांना मोफत नागरिकत्व दिले. अरब लोकांना कळलेही नाही की, कधी यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन आपल्या ताब्यात घेतली व एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना जमवले; ज्यामुळे येथे हा देशच तयार झाला.
सुरुवातीला पैसे देऊन जमीन विकत घेणारे ज्यू, आता आपल्या देशाची आर्मी तयार करून अरब लोकांवर दडपशाही करू लागले.
आपल्याकडे अनेक मिथके आहेत की, इस्त्रायल हा देश भन्नाट आहे, तेथील लोक खूप वेगळे आहेत, खूप हुशार आहेत, ते काहीही करू शकतात, त्यांच्या नादी लागायचे नाही, इत्यादी.
वस्तुतः असे काहीही नाही. इस्त्रायलने आजपर्यंत जे काही केले, ते पूर्णपणे अमेरिकेच्या मदतीवर. या मुस्लिम देशांच्या मध्ये आपल्या आदेशानुसार चालणारा एक देश असावा, ही अमेरिकेची राजनीती होती. आजही आहे. त्यामुळे, अमेरिकेसारख्या महासत्तेचा पाठिंबा असताना इस्त्रायलला कोणास घाबरण्याचे कारणच नव्हते.
तरीही इजिप्तने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. या इजिप्तचा त्यांनी सातच दिवसात पराभव करून फडशा पडला. त्यांचीही काही जमीन बळकावली.
पॅलेस्टाईन :
ज्या अरब लोकांच्या जमिनी इस्त्रायलने बळकावल्या त्यांच्याकडे आता फारच कमी जमीन राहिली. आपण जमिनी विकण्याचा मूर्खपणा केल्याबद्दल त्यांना आता पश्चाताप होऊ लागला. शिक्षण नसल्याने त्यांची अजून अधोगती होऊ लागली. थोड्याफार राहिलेल्या जमिनीवर त्यांनी स्वतःचा पॅलेस्टाईन हा देश तयार केला.
या देशाचा कायम एकच उद्देश राहिला आहे की, आपण गमावलेल्या जमिनी परत मिळवणे. शिक्षण, अमेरिकेचा पाठिंबा, प्रगत तंत्रज्ञान व मोठ्या प्रमाणात व्यापार यामुळे इस्त्राईल श्रीमंत होत गेला. या सर्व गोष्टींच्या अभावी पॅलेस्टाईन मात्र गरीबच राहिला. धर्म वेगळे असल्याने त्यांच्यात द्वेष वाढत गेला.
इस्त्रायला हिंसेने प्रभावी प्रत्युत्तर देण्यासाठी, पॅलेस्टाईन मध्ये हमास नावाची एक आतंकवादी संघटना स्थापन झाली. पॅलेस्टाईन ला माहित आहे की, आता त्यांची जमीन त्यांना परत मिळणे अशक्य. त्यामुळे इस्रायलला ज्या प्रकारे त्रास देता येईल, त्या प्रकारे द्यायचा; हेच त्यांचे उद्दिष्ट राहिले आहे.
आज हमासने केलेला हल्ला त्याचाच एक भाग..
या सर्व प्रकरणात, कोण योग्य - कोण अयोग्य हे ठरवणे कठीण.
जो अन्याय हजार वर्ष ख्रिश्चन ज्यू लोकांवर करत होते, तोच अन्याय ज्यू लोकांनी इस्लाम व्यक्तींवर केला.
सामान्य इस्त्रायली नागरिक मात्र आता बदलत चालला आहे.
अनेक इस्त्रायली लोक स्वतःहून ज्यू धर्म सोडत आहेत. निधर्मी होत आहेत.
पॅलेस्टाईन वासियांसोबत शांतपणे एकत्र नांदू अशी भाषा करत आहेत.
पॅलेस्टाईन वासियांची सुद्धा हीच इच्छा आहे.
परंतु, तेथील राजकारण्यांना हा प्रदेश ताब्यात ठेवण्यासाठी व मुख्यतः अमेरिकेला आपला प्रभाव येथे टिकवण्यासाठी; या गोष्टी घडवून आणाव्या लागत आहेत. नाहीतर दारिद्र्याने पिचलेल्या गरीब पॅलेस्टाईनकडे पाच हजार रॉकेट्स कुठून येणार, हा प्रश्न कोणत्याही सामान्य बुद्धीच्या व्यक्तीला सुद्धा सुचला असता. राजकारणी आपला खेळ खेळत आहेत व त्यात सामान्य जीवांचे जीव जात आहेत.
काही भारतीय मात्र एवढा जोश दाखवत आहेत की, जसे हे त्यांच्या घरातीलच युद्ध आहे. एक गोष्ट कायम समजून घ्या, स्वार्थाशिवाय कधीही युद्ध होत नाही आणि युद्धात असलेला स्वार्थ फक्त सत्ताधीशांच्या फायद्यासाठी असतो सामान्यांसाठी नाही.
.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा