भारत आणि Porn

 



जगात सर्वात जास्त Porn पाहणाऱ्या महिला कोणत्या देशात आहे माहित आहे?

याचे उत्तर आहे भारत आणि अर्जेंटिना.


Pornhub आणि The Daily Beast या संकेतस्थळांनुसार भारतीय आपल्या इंटरनेटचा 50% भाग Porn पाहण्यासाठी वापरतात. Porn म्हणजेच शारीरिक संबंध दर्शवणाऱ्या चित्रफित किंवा व्हिडिओ. सर्वच भारतीय यात येतील असे नाही. काही बिलकुल पाहत नसतील, काही दहा ते वीस टक्के भाग यासाठी वापरत असतील तर काही अगदी 90% भाग porn पाहण्यासाठीच वापरत असतील.

Porn फक्त पुरुषच पाहतात हा गैरसमज सुद्धा या संकेतस्थळांनी खोडून काढला. Porn पाहणाऱ्या महिलांपैकी 30% महिला भारतीय आहेत.

तरुण मुलींमध्ये Lesbian porn (स्त्रियांचे स्त्रियांसोबतच शारीरिक संबंध) पाहण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींमध्ये हे मोठ्या प्रमाणात दिसून येते. 


ही सर्व माहिती भारतासारख्या संस्कारी देशासाठी नक्कीच आश्चर्यकारक ठरेल. 

परंतु, हीच योग्य वेळ आहे की हा संस्कारीपणाचा खोटा मुखवटा बाजूला सारत व सत्य परिस्थितीला सामोरे जात आपण गोष्टी नीट हाताळायला हव्या.


भारतात इंटरनेट हे मुख्यतः मनोरंजन कार्यासाठीच वापरले जाते. त्यातही या प्रकारचे व्हिडिओ लोकांना नक्कीच आकर्षूण घेतात. त्यामुळेच भारतीयांनी सर्वात जास्त सर्च केलेल्या शब्दांमध्ये खालील शब्द आढळतात. 


1) Fellatio - मुखमैथुन

2) Beastiality - प्राण्यांसोबत शारीरिक संबंध

3) Orgy - अनेक स्त्री व पुरुषांनी एकत्र येत केलेले शारीरिक संबंध 


वाचून किळसवाणे वाटू शकते. मात्र सत्य परिस्थिती हीच आहे. अगदी भारतीय नकळतपणे एका नवीन संकल्पनेशी जोडले जात आहेत.

Voyeurism - एखाद्या व्यक्तीला कमी कपड्यात किंवा विना कपड्याचे पाहणे. 

या प्रकारचे व्हिडिओ सुद्धा भारतीयांना पाहणे आवडते. 

असे व्हिडिओ मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी छुपे कॅमेरे बसवलेले असतात. 

लहान मुलांचे किंवा लहान मुलांसोबतचे सेक्स व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. लहानपणीच्या अशा मानसिक धक्क्यामुळे अनेक मुले आयुष्यभर शारीरिक संबंधांना घाबरतात.

तरीही भारतामध्ये सर्रासपणे या प्रकारचे गुन्हे घडतात, ते लोकांच्या मागणीमुळेच. 


Porn चा नवीन पिढीवर एक विचित्र परिणाम पाहायला मिळतोय. 

अनेक व्यक्तींना मग मुलगा असो की मुलगी/स्त्री असो की पुरुष, चॅटिंग करताना अश्लील भाषेत बोलायला आवडते. 

प्रेम या भावनेत काही जणांचा फक्त जास्तीत जास्त शारीरिक संबंध जपण्यावरच भर असतो.

शारीरिक संबंधात असताना आपल्या साथीदाराकडे लक्ष न देता काही विशिष्ट कृती करणे आणि पाहिलेले व्हिडिओ डोळ्यासमोर आणणे यावर अनेकांचा भर असतो. 

ही सर्व माहिती या विषयावर रिसर्च करताना काही संस्थांना अनेक व्यक्तींकडून मिळाली. या व्यक्तींना आपल्याकडून या गोष्टी नेमक्या का होतात याची जाणीव नसते. Porn ही अशी गोष्ट आहे जी त्यांच्या मनाचा अशा प्रकारे ताबा घेते की, त्या नशेतच राहणे लोकांना आवडते. 


सध्या त्यामुळेच भारतात काही अशा वेबसाईट सुद्धा सुरू झाल्या आहेत ज्यावर जाऊन तुम्ही या प्रकारचे अश्लील संभाषण करू शकता. त्यासाठी अगदी लोक पैसे भरण्यास सुद्धा तयार असतात. त्यांच्या या परिस्थितीचा फायदा उचलत अनेक वेळा त्यांना लूटले सुद्धा जाते. एकट्या महाराष्ट्रामध्ये फेक अकाउंट तयार करून Sexual chatting करत पैसे उकळण्याच्या फक्त 2023 या वर्षात 19536 केसेस आहेत. या चॅटिंग मध्ये मुख्यत: महिला मोठ्या प्रमाणात भाग घेतात. कारण खऱ्या आयुष्यात त्यांना त्यांच्या साथीदाराने नीट समजून घेतलेले नसते. त्यामुळे आपले मन त्या इथे मोकळे करतात.


Porn website मुद्दाम लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या प्रकारचे व्हिडिओ इंटरनेटवर टाकतात. सामान्य भारतीयांचे किंवा सामान्य घरातील भारतीयांचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत, कारण असेच व्हिडिओ लोकांना आवडतात. अगदी सर्च करताना हिंदू वुमन - मुस्लिम वूमन अशा प्रकारचे सर्च सुद्धा केलेले पाहण्यात आले आहेत. नकळतपणे या गोष्टी आपल्यातील धार्मिक व वांशिक भेदभाव वाढवत असतात. 

सर्वात जास्त तामिळ व मराठी भाषा बोलणारे व्हिडिओ पाहिले जातात. याचा अर्थ महाराष्ट्र या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यात नक्कीच खूप पुढे आहे. 


Porn video जरी पंधरा-वीस मिनिटे ते अर्ध्या तासाचा असला, तरी प्रत्यक्षात त्यातील अभिनेता व अभिनेत्री जास्तीत जास्त पाच मिनिटे शारीरिक संबंध ठेवतात. या प्रकाराला अनेक कॅमेरे वेगवेगळ्या अँगलने चित्रित करत असतात. नंतर या सर्व कॅमेऱ्यांनी रेकॉर्ड केलेला भाग एडिटिंग करून एकत्र केला जातो. त्यामुळे तो व्हिडिओ मोठा बनतो. खऱ्या आयुष्यात हे शक्य नसते. मात्र आजचा भारतीय तरुण या सर्व गोष्टींना खरे मानत आपल्या देहावर नको ते विकृत प्रयोग करत बसतो. अनेक वेळा त्याचे मानसिक संतुलन सुद्धा बिघडते.


लग्नाच्या आधी अनेकांना Porn पाहण्याची सवय असते. लग्न झाल्यानंतर आपल्या साथीदारासोबत याच सर्व गोष्टी करण्याचा अशा व्यक्तींकडून प्रयत्न केला जातो. हे लोक एका आभासी जगात जगत असतात; त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होतात. अशा व्यक्तींच्या साथीदारांना ही व्यक्ती अतिशय खालच्या दर्जाची आहे असे वाटू लागते. पॉर्नोग्राफीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक संबंध करण्यासाठी लोक प्रोत्साहित तर होत आहेत; मात्र त्यामध्ये एक प्रकारची जबरदस्ती असते जी लोकांचे भावनिक संबंध संपवते.


Porn ही गोष्ट भारतासाठी नवी नाहीये. भारतीय पुराणकथा व शास्त्रांमध्ये शारीरिक संबंधांबद्दल भरपूर लिखाण केले गेले आहे. 

1) सरस्वतीपुराण मध्ये ब्रह्मा सरस्वतीला स्वतःसाठी कशाप्रकारे तयार करतो व संभोग करतो याबद्दल माहिती आढळते.

2) खजुराहोच्या मंदिरात अनेक मुर्त्या प्रणय क्रियेशी संबंधित आहेत.

3) कार्ल्याच्या बौद्ध लेण्यांमध्ये दोन विवस्त्र महिला एकमेकांना अलिंगन देताना दाखवल्या आहेत.

4) शिवलिंग म्हणजेच पुरुषाचे लिंग व स्त्रीची योनी यांचा संभोग दर्शवणारे शिल्प. 

5) शंकराला अर्धनारीनटेश्वर स्वरूपात सुद्धा दाखवले जाते.

6) अय्यप्पा हा तृतीयपंथी देव मानला जातो.


त्याकाळच्या समाजामध्ये शारीरिक संबंध या विषयावर व्यक्त होण्यासाठी जी खुली विचारसरणी हवी असते ती नक्कीच होती. आज आपण ती पूर्णपणे हरवून बसलो आहोत. त्यामुळेच प्रजननाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगाला नीट समजून न घेता आपण त्याच्यावर दूध वाहणे काय, बेलपत्र वाहणे काय, असल्या गोष्टी करत बसतो.

एकीकडे शंकराच्या अर्धनारीनटेश्वर रूपाची पूजा तर होते; त्याचसोबत दुसरीकडे तृतीयपंथी लोकांना वाईट वागणूक देणे किंवा त्यांची किळस करणे हे प्रकार सुद्धा होतात. कामसूत्र सारखा अलौकिक ग्रंथ जगाला देणारा भारत आज याबाबतीत अतिशय मागास झाला आहे. 


हा मागासलेपणाच भारतीयांना लपून-छपून उद्योग करण्यास प्रवृत्त करतो. ज्यामध्ये सर्वात जास्त Porn पाहणे ही गोष्ट अंतर्भूत होते. अगदी लहान मुलांपर्यंत सुद्धा सोशल मीडियाद्वारे या सर्व गोष्टी पोहोचल्या आहेत. लहान मुलांचे बालपण त्यामुळे कधीच हरवले आहे. लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्यास आज कोणास गैर वाटत नाही किंबहुना ती गरज वाटू लागली आहे. 


शारीरिक संबंध या विषयावर बोलणं, भारतीयांना अगदी पाप केल्यासारखं वाटतं. पाहायला गेले तर सेक्स ही अशी गोष्ट आहे जी आपले मानसिक व शारीरिक आरोग्य व्यवस्थित ठेवते. कधी-कोणासोबत शारीरिक संबंध ठेवावेत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकाचा मूलभूत अधिकारच आहे तो. परंतु, हा अधिकार हा त्यांच्या मनातून उमजलेला आहे की Porn पाहून प्रवृत्त करणारा आहे, हे ज्याचे त्याने ठरवावे.


Porn पाहण्याच्या सवयीमुळे एका व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवणे लोकांना कंटाळवाणे वाटू लागले आहे.

Porn पाहण्याचाच परिणाम असा की एकापेक्षा अधिक लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यावर भारतीयांचा भर वाढत आहे. अनेक विवाहित दांपत्य याबाबतीत अगदी एकमेकांना पाठिंबा सुद्धा देतात. या गोष्टी योग्य की अयोग्य हे ठरवणे माझे काम नाही. या गोष्टी घडवण्यासाठी जर काही कारणीभूत ठरत असेल तर ते सर्वांसमोर ठेवणे हे मात्र माझे कर्तव्य आहे. त्यामुळेच हा लेखप्रपंच.


सेक्स एज्युकेशन ही काळाची गरज आहे. भारतात संस्काराच्या नावाखाली किंवा राजकीय पक्षांच्या विरोधामुळे अनेक पिढ्या या गोष्टीपासून दूर राहिल्या. अनेक तृतीयपंथी आपले खरे स्वरूप समाजासमोर मांडू इच्छितात. मात्र भारताची बुरसटलेली विचारसरणी अशा व्यक्तींना तिरस्कारयुक्त नजरेने पाहून त्यांचे खरे स्वरूप लपवण्यास भाग पाडते.


केरळ व तामिळनाडू मध्ये 1970-80 च्या दशकात Soft Porn बोलता येतील असे चित्रपट तयार केले जाऊ लागले. या चित्रपटांमध्ये शारीरिक संबंधांसोबतच महिलांचे अधिकार व त्यांचे समाजातील स्थान सुद्धा प्रभावीपणे दाखवले जायचे. आजचे Porn पूर्णपणे वेगळे आहे. येथे स्त्रीला एका गुलामासारखे वागवले जाते. फक्त पैसे कमावणे हा आजच्या या बिजनेसचा हेतू आहे. भारतीयांना मात्र त्यांचे पैसे व त्यांची वेळ नेमकी कुठे जातेय याचे भान राहिलेले नाही.


जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश जर शारीरिक संबंधांवर मोकळेपणाने चर्चा करत नसेल, तर त्याचा समाजावर नकारात्मक परिणाम होणार हे नक्कीच. कारण लोकसंख्येकडे पाहता या गोष्टींना महत्त्व तर भरपूर दिले जाते; परंतु, सर्वांसमोर या विषयावर बोलणे टाळले जाते. 

या गोष्टी बोलल्या जात नाहीत त्यामुळेच, अनेक व्यक्ती आपले मानसिक संतुलन हरवून बसतात, अनेक स्त्रिया आपला स्वाभिमान गमावून बसतात, अगदी काही व्यक्ती आत्महत्येपर्यंत पोहोचतात आणि तरीही फक्त संस्काराच्या नावाखाली भारतीय या विषयावर बोलण्यापासून दूर राहतात.


Porn पहावे की नको हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. काही लोक अगदी दारू पिऊन सुद्धा अतिशय संयमित व शांत असतात. भारतात Porn पाहणाऱ्या 95% लोकांची परिस्थिती ही त्या बेवड्यांसारखी झाली आहे; जे दारू पिऊन स्वतः सुद्धा त्रास करून घेतात व इतरांना सुद्धा देतात. भारतात वरवर जरी नाही म्हटले तरी शारीरिक संबंध हा लोकांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. परंतु, ते नीट मिळत नाही किंवा होत नाही आणि मग वाट Porn च्या दिशेने जाते. त्यामुळे यावर जास्तीत जास्त बोलणे हेच या समस्येला संपवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.


- अमित 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट