मन

wandaring mind


नेमकं कळत नाही या मनाचं काय चालू असतं,
कधीही काहीही विचार, तर्क करत असतं . . .

कोणी दिला आनंद तर त्यास दुवा देत असतं,
दुःखात मात्र हे स्वतःलाच कोसत असतं . . .

आप्तेष्टांच्या ओढीने, अश्रू ढाळत असतं,
जवळ असताना मात्र त्यांची पर्वा करत नसतं . . .

हरलो . . . तर स्वतःचे सांत्वन करत असतं,
आणि जिंकल्यावर सुद्धा . . . मित्रांच्या हरण्याचं दुःख बाळगत असतं . . .

का देतं हे नेहमी भावनेला थारा,
स्वार्थीपणाचा लवलेशही बाळगत नसतं,
दुसऱ्यांचा विचार करता करता,
स्वतःच स्वत्वच विसरून जात असतं . . .

करत असतं कोणावर प्रेम,
बोलायच धाडस मात्र करत नसतं,
कधी आईवडिलांची, कधी समाजाची,
तर कधी स्वतःचीच भिती बिचारे बाळगत असतं . . .

हवा असतो कोणाचातरी आसरा,
बोलत मात्र कोणालाच नसतं,
अब्जावधी लोकांच्या जगात,
सारी दुःखे एकटेच पचवत असतं . . .

हे होणार की नाही, ते होणार की नाही,
सार्‍या चिंता एकटेच करत असतं,
चिंता काही संपत नाही,
कधीतरी स्वतःच संपून जात असतं . . .

नेमकं कळत नाही या मनाचं काय चालू असतं,
कधीही काहीही विचार, तर्क करत असतं . . .

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट