शुश्रुत - जगातील पहिला सर्जन
जगातील पहिली शरीर शस्त्रक्रिया करणारा व्यक्ती भारतीय होता; असे मी म्हणालो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
आज पासून जवळजवळ २६०० वर्षांपूर्वी शुश्रुत नावाच्या व्यक्तीने भारतात शारीरिक शस्त्रक्रियेचा पाया रोवला.
वैदिक कालखंडात औषधोपचाराबद्दल विविध प्रकारचे ज्ञान उपलब्ध होते. काशी येथे शुश्रुत यांनी औषधांबद्दल व शरीर रचनेबद्दलचे ज्ञान प्राप्त केले. त्या काळात युद्ध ही सामान्य बाब होती व अनेक सैनिकांना आपला हात, पाय किंवा शरीराचा एखादा भाग युद्धामध्ये गमवावा लागत असे. या सैनिकांच्या जखमांवर विविध झाडांच्या पाल्याचा रस लावून ते ठीक होईल याची वाट पाहिली जात असे. मात्र त्यामध्ये नेहमीच यश मिळायचे नाही. त्या सैनिकांच्या वेदना पाहून शुश्रुतना शारीरिक शस्त्रक्रिया करण्याची प्रेरणा मिळाली.
फक्त युद्धच नाही; तर त्या काळात अपराधाबद्दल शिक्षा म्हणून नाक किंवा कान कापणे, अशा निघृण शिक्षा अनेकांना भोगाव्या लागत असत. त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी शुश्रुत यांनी सुरुवातीला नाक जोडण्याची शस्त्रक्रिया सुरू केली. आज त्याला Rhinoplasty असे म्हणतात.
भारतात आज सुद्धा लोकांना मोतीबिंदू मोठ्या प्रमाणात होतो. अनेक व्यक्ती मोतीबिंदूमुळे आपले डोळे सुद्धा गमावतात. त्या काळात शुश्रुतनी मोतीबिंदूचे यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून निदान केले. शुश्रुत संहितेच्या ‘उत्तरतंत्रामध्ये’ याबद्दल माहिती आहे.
‘राग व त्वेष ज्याप्रमाणे शरीराचे तुकडे करण्यास उपयोगी पडतो, त्याचप्रमाणे दया व करुणा, तुटलेल्या भागांना जोडण्यास उपयुक्त ठरतात. त्या आपल्या मनी कायम असाव्या.’
असे शुश्रुत यांचे म्हणणे होते.
शस्त्रक्रिया करताना आपल्याला विविध अवजारांची गरज पडू शकते, हे शुश्रुतना जाणवले. गरज ही शोधाची जननी असते. या गरजेमुळेच शुश्रुतनी १२१ प्रकारची शस्त्रक्रिया करणारी अवजारे तयार केलीत. आजचे डॉक्टर त्यांच्यापुढे असलेल्या कामात गुंतून राहतात. शुश्रुतना फक्त डॉक्टर नाही, तर वैज्ञानिक व कलाकार सुद्धा मानावे लागेल, ज्यामुळेच त्यांचे कार्य सहज होण्यासाठी त्यांनी हे मार्ग शोधून काढलेत.
पुढे त्यांनी त्यांच्या या सर्व ज्ञानाला पुस्तक रूपाने बद्ध केले. आज त्या पुस्तकाला ‘शुश्रुत संहिता’ या नावाने ओळखले जाते. या पुस्तकाला आयुर्वेद व त्यामुळेच अपरिहार्यपणे अथर्ववेदामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले.
आजचे डॉक्टर शरीराला कापण्यासाठी वेगवेगळी तीक्ष्ण हत्यारे वापरतात. त्या काळात अशी सूक्ष्म आणि तीक्ष्ण हत्यारे उपलब्ध नव्हती. त्यामुळे शरीराचा अभ्यास करण्यासाठी ते एखाद्याच्या मृत शरीराला पाण्यामध्ये बांधून ठेवायचे. जेणेकरून ते शरीर हळूहळू सडायचे व वेळोवेळी सुश्रुत या शरीराच्या प्रत्येक स्तराचे नीट निरीक्षण करून त्याचे अध्ययन करायचे.
शुश्रुतांचे हे ज्ञान अरब व्यापाऱ्यांनी ‘किताब शुन अल’ व ‘किताब इ सुश्रृद’ या पुस्तकांच्या रूपात आठव्या शतकात जगभरात पोहोचवले. ब्रिटिश अभ्यासक हेसलर यांनी या पुस्तकाचे लॅटिन मध्ये, तर म्युलर यांनी जर्मन मध्ये भाषांतर केले. याप्रकारे जगाला शुश्रुत यांचे वैद्यकीय ज्ञानातील योगदान कळले.
शुश्रुतचा अर्थच आहे की ज्याची ख्याती सर्वांपर्यंत पोहोचली. त्यांनी निश्चितच आपल्या नावाला सार्थ होऊन दाखवले.
संदर्भ :
१) Wonder that was India - A L Basham
१) Wonder that was India - A L Basham

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा