पाऊस
कोणी मला वरदान म्हणतात, 😇
तर काहींसाठी आहे मी नुसतीच मजा . . . 😃
कोणी मी येण्याची आतुरतेने वाट पहातात, 🧐
तर काही मात्र पाण्याने घर भरल्यावर माझ्या नावाने बोटे मोडतात . . . 😄
कोणाला होत असतो गरमीचा त्रास, 🥵
तर कोणास हवी असते छत्रीची साथ . . . ☔
शेतकऱ्यांसाठी मी कळीचा मुद्दा आहे,
त्यांच्या सुखादुःखात माझा नेहमीच सहभाग आहे . . . 🤗
तरूणांना मात्र माझ्यामुळे वेगळेच कारण मिळते, 🥳
काहींना फुटबॉल खेळायला तर काहींना प्रेमराधना करावयास मिळते . . . 🥰
गाड्या उशिरा सुटल्याने सगळेच शिव्या देतात, 🤨
सुट्टीच्या दिवशी मात्र हेच चहासोबत माझा आनंद घेतात . . . ☕
काही अतिशहाणे कृत्रिम पावसाच्या वल्गना करतात,
मी पण काही कमी नाही, माझ्यापुढे सारेच हरतात . . . 😎
मनुष्याचा भावनांचा मी नेहमीच सोबती राही,
माझ्या भावनांना मात्र का कोणी ओळखत नाही . . . 😔
कोणी म्हणतं वळवाचा तर कोणी बोलतं मान्सून आहे,
माझ्या मनाला मात्र या धरित्रीची ओढ आहे . . . ☺
येतो मी प्रत्येक वेळा जेव्हा तिला माझी गरज असते,
भरून टाकतो तिचे अंगण, जेव्हा ती दुःखात असते . . . 🌿
ना तिचा संदेश, ना कोणती हाक असते,
जरी दुर असलो, तरी नजर मात्र तिच्यावर असते . . . 🌨
ही मैत्री आहे, प्रेम की अजून काही, मनुष्य रंगवेल आमच्या नात्याचं चित्र,
आम्हास त्याचे काय, आम्ही आहोत निसर्गाची लेकरं . . . 😊

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा